मृत्युनंतरही अनुभवला ‘त्याने’ प्रेमाचा ओलावा

अनाथ गतिमंद मुलावर केले मुकुटबनवासीयांनी अंतीमसंस्कार

0

सुशील ओझा, झरी: अनेकदा सख्ख्या गणगोतांचंही प्रेम बऱ्याच जणांना मिळत नाही. मात्र अशोकला जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरही गावकऱ्यांनी जपलं. तो अनाथ होता. तो गतिमंद होता. सर्वसामान्यांपेक्षा वेगळा होता. 25 वर्षांपूर्वी तो मुकुटबनला भटकत भटकत आला. मुकुटबनवासीयांनी तेवढ्याच प्रेमानं त्याला स्वीकारलं.

गावात फिरून घरोघरी किंवा हॉटेलमध्ये भीक मागून तो जगत होता. पानटपरी, हॉटेल्स, देवस्थान व इतर ठिकाणी झोपून आपली रात्र काढत होता. अशोकचं निधन झालं. त्याच्या नातेवाईकांची कुणालाच माहिती नव्हती. शेवटी मुकुटबनवासी पुढे सरसावलेत.

कुटुंबातील सदस्य समजूनच त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेत. शंकरचं कुणीच नव्हतं तरी शंकर सर्वांचाच होता. तो जिवंत असताना गावकऱ्यांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. तो गेल्यावरही गावकऱ्यांनी प्रेमाचा ओलावा तसाच कायम ठेवला.

गावातील तरुणांसोबत शंकर रमायचा. मौजमस्तीही करायचा. गावात 25 वर्ष राहूनही कधी त्या गतिमंद मुलाने कुणाला शिवीगाळ किंवा मारहाण केली नाही. तो अत्यंत शांत आणि सुस्वभावी होता. त्यामुळे गावातील बहुतांश लोक त्याच्यासोबत नेहमी प्रेमानेच वागत.

 

‘बडबडा’ अबोल करून गेला

गावात त्याला कुणी अशोक तर कुणी बडाबडा अशोक म्हणून ओळखत. त्याला  तेलगू किंवा मराठीदेखील धड बोलता येत नव्हते. २५ वर्षांत त्याला संपूर्ण मुकुटबनसह परिसरातील लोक ओळखायला लागलेत. त्याचं मोडकं तेलगू व मराठी बोलणं लोकांना आवडायचं. दोन दिवसांपूर्वी अचानक त्याची प्रकृती खराब झाली. ग्रामवासीयांनी वणी येथील रुग्णालयात त्याला दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अशोक बडाबड्याचा मृत्य झाल्याची वार्ता सोशल मीडियावर पसरताच लोकांची गर्दी वाढली. त्याचा अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. व्यापारी आणि गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली. बसस्थानकाजवळील दुकानदार गंगारेड्डी बच्चेवार यांच्या घरून अंत्ययात्रा काढण्यात आली. रीतिरिवाजाने ही अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत गावातील व्यापारी, प्रतिष्ठित, महिला व युवक सहभागी झालेत. शंकर बडबडा होता; मात्र तो गावकऱ्यांना आता अबोल करून गेला.

अंतिमसंस्कार करण्यात गंगारेड्डी बच्चेवार, किरण माहुलकर, चंदू चिंतावार, श्रीनिवास संदरलावर, अजिंक्य अक्केवार, संजय आगुलवार, राजेश अक्केवार, प्रकाश ऐसेकर, रवी अक्केवार, मधुकर जिनावार, राकेश ताडूरवार, संदीप कांदसवार, गजानन पालकोंडवार यांनी पुढाकार घेऊन एक माणुसकी जपून पुढाकार घेतला. 25 वर्ष आपल्यासोबत राहिलेल्या अशोकच्या डोक्यावर गावकऱ्यांनी मायेचा हात ठेवला. त्यामुळे अशोकच्या मृत्यूने संपूर्ण गाव गहिवरले.

हेदेखील वाचा

पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…

हेदेखील वाचा

पत्रकाराच्या अटकेविरोधात उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.