‘रॉयल फाऊंडेशन’च्या कार्यालयीन फलकाचे उद्घाटन

लवकरच होणार वणी, मारेगाव शहर व तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

0

जब्बार चीनी, वणी: शहरातील नुकत्याच स्थापन झालेल्या रॉयल फाउंडेशनच्या कार्यालयीन फलकाचे शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनिष महादेव चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मनिष चौधरी यांनी 65 हजार रुपये किमतीचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संस्थेला भेट दिले.

या प्रसंगी ऍड नीलेश चौधरी आणि डॉ. रोहीत वनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. समाजाप्रती असलेल्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याकरिता ‘रॉयल फाऊंडेशन’ ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात संस्थेची वणी, पांढरकवडा आणि राळेगाव शहराची व लगेच तालुक्याची कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. त्यानंतर संस्थेच्या कामाला सुरवात होणार आहे. या करिता सामान्य जनतेची साथ आणि सहकार्य गरजेचे असल्याचे रॉयल फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फलक अनावरणाच्या वेळी वर्षा राजेश कचवे, ऍड नीलेश महादेव चौधरी, डॉ. रोहित सुधाकर वनकर. निकुंज अशोक अटारा, सागर वंजारी, अजय टोंगे, ललित राजेश कचवे इत्यादींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

भरधाव बोलेरोची अज्ञात वाहनाला भीषण धडक, गाडी चकनाचूर

मुकुटबन पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदारांसह 3 कर्मचारी निलंबित

Leave A Reply

Your email address will not be published.