आज संध्याकाळी जैताई मंदिरात भक्तीगितांचा कार्यक्रम
जैताई चैत्र नवरात्री महोत्सवाला आजपासून सुरूवात
पुरुषोत्तम नवघरे, वणी: जैताई चैत्र नवरात्राचा शुभारंभ सुश्राव्य गायनाच्या कार्यक्रमाने होत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला दि. २ एप्रिल रोजी वर्धा येथील सुप्रसिध्द गायिका खुशबु कठाणे यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित आहे. कार्यक्रम रात्री ७.३० वाजता मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. या बहारदार कार्यक्रमाची वाद्यसंगत जीवन बांगडे (वर्धा) आणि अजित खंडारे (वणी) अनुक्रमे तबला व संवादिनीची साथ देऊन करणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन श्री जैताई देवस्थान व श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. दरम्यान आज सकाळी ग्रामीण रुग्णालयाला जैताई अन्नछत्र समितीच्या वतीने एक कुलर भेट देण्यात आला. गत वर्षीच्या उन्हाळ्यात ग्रामीण रुग्णालयाला जैताई अन्नछत्र समितीने तीन कुलर भेट दिले होते.
हे देखील वाचा:
गुढीपाडव्यानिमित्त गावरान तडका रेस्टॉरन्टमध्ये खास व्हेज डिशचा बेत
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुडीपाडवा स्पेशल ‘ठंडा ठंडा कुल कुल’ ऑफर
गुडीपाडवा समर सेल… सर्वोत्कृष्ट मानला जाणारा O General एसी आता वणीत
Comments are closed.