अधिकारी कार्यालयात टुन्न…. कोतवाल संघटनेची निवेदनाद्वारे तक्रार
पैशाची मागणी केल्याचा आरोप, कारवाईची मागणी
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील उप कोषागार अधिकाऱ्याकडून कोषागारमध्ये काम घेवुन गेल्यानंतर त्रास दिल्या जातो व पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी यावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने वरिष्ठांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष शशी निमसटकर यांचे नेतृत्वात तहसिलदार यांचे मार्फत सदर निवेदन देण्यात आले.
मारेगाव येथील कोषागारमध्ये कार्यरत उप कोषागार अधिकारी कार्यालयीन वेळेत नेहमीच मद्य सेवन करुन येतात. त्याचप्रमाणे उर्वरित रजा रोखी करण्याचे बिलामध्ये कुठल्यातरी कारणाने त्रास देवुन नेहमीच त्रुटी काढुन बिल परत करतात व सदैव पैशाची करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर उप कोषागार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे जिल्हा कोतवाल संघटनेचे अध्यक्ष शशी निमसटकर यांचे नेतृत्वात मारेगाव तालुका संघटनेच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत वरिष्ठांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मारेगाव तालुका संघटनेचे अध्यक्ष सुरेश येरमे, उपाध्यक्ष गणेश उराडे, सचिव अतुल बोबडे, यांचेसह रोशनी वरखडे, कल्पना नंद्रे, अमित येवले, जगदीश कनाके, योगेश भट, देवानंद मोहुर्ले, विनोद मडावी, अशोक पेंदोर, लहु भोंगडे उपस्थित होते.
हे देखील वाचा:
वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू
अवघ्या 3 हजारांमध्ये प्ले गृप, नर्सरी, यूकेजी, एलकेजीसाठी प्रवेश निश्चित