कुंभा-बोरी(गदाजी)-खैरी मार्गावर खड्याचे साम्राज्य
आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येण्याऱ्या करणवाडी-खैरी या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. कुंभा- बोरी (गदाजी) – खैरी या मार्गावर मोठ मोठे गड्डे पडले आहे. डांबर पूर्णपणे निघून गेले आहेत. त्यामुळे येथे या मार्गाने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही काळापासून हा रस्ता दुर्लक्षीत असला तरी या रस्त्याकडे आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशी करीत आहे.
सदर रस्ता हा मारेगाव तालुक्यातील वरदळीचा असून गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे. या रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडले आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या खड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खराब रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
या रस्त्यात सध्या चिखलाचा खच झाला असून रात्रीच्या वेळी तर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. मारेगाव येथे अनेकदा रुग्णाला उपचारासाठी न्यावे लागते. मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे रुग्णांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
हे देखील वाचा:
टाकळी-दाभा दरम्यान ट्रकचा अपघात, पुलाच्या कठड्यात अडकला क्लिनर
प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक व विक्री प्रकरणी आज आणखी दोघांना अटक