अखेर वृद्ध दाम्पत्याला मिळाले छत, उघड्यावर सुरू होता संसार
शिवजयंतीला कुंभ्याचे नवनिर्वाचित सरपंच अरविंद ठाकरे यांच्यातर्फे मदत
नागेश रायपुरे, मारेगाव: काही दिवसांआधी कुंभा येथील एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या घराचे छत वादळी वा-यात उडून गेले. तेव्हापासून त्या वृद्ध दाम्पत्यांचा संसार उघड्यावर आला होता. मात्र शिवजयंतीला त्यांच्या त्यांच्या डोक्यावर छत आले आहे. या कार्यात त्यांना कुंभा येथील नवनिर्वाचित सरपंच अरविंद ठाकरे यांनी मदत केली. दिनांक 31 मार्च रोजी शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात या वृद्ध दाम्पत्याला शेडसाठी टिनाची पेटी सुपुर्द करण्यात आली.
तालुक्यातील कुंभा येथे लटारी लोंनबले व बहिणाबाई लोनबले हे वयवृद्ध दाम्पत्य राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्ती मुळे त्यांचे घराचे छत पडले होते. त्यांची आर्थिक परस्थीती अत्यंत बिकट आहे. त्यांच्याकडे छत लावण्यासाठीही पैसे नव्हते.
उन्ह, वारा, पाऊस झेलत त्या दोघांचा संसार उघड्या छताच्या घरातच सुरू होता. वृद्ध दाम्पत्यांनी घरकुलासाठी अर्ज देखील केला होता. मात्र लालफितीच्या कारभारातून घरकुलाला लाभ कधी मिळणार याची काहीही शास्वती नव्हती. सदर बाब कुंभा येथील नवनिर्वाचित सरपंच अरविंद ठाकरे यांच्या निदर्शनास आली. येताच त्यांनी घरकुल ची वाट न बघता स्वखर्चाने शिवजयंतीच्या पर्वावर त्या वृद्ध दांपत्याला टिनपत्र्याची पेटी भेट दिली व त्यांना टिनपत्र्याच्या शेडचा आसरा निर्माण करून दिला.
दिनांक 31 मार्च रोजी कुंभा येथील चौकात शिव जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात त्या वृद्ध दाम्पत्यास टिन पत्र्याची पेटी भेट देण्यात आली. कुंभा वासियांनी सामाजिक उपक्रम राबवून शिव जयंती साजरी केली. त्यामुळे त्याचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी दिलीप पावडे, मारोती ठाकरे, गजानन ठाकरे, मुकेश महाडुळे, संदीप डुकरे, अजय भन्साळी, मयूर ठाकरे, सुरेश घोटेकर, पंकज सतेज, उत्तम बलकी, अमोल चौधरी आदी उपस्तीत होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार मारोती मुपीडवार यांनी केले. कोविड 19 च्या नियमांचे पालन करून शिव जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला.
गरजुंच्या अडीअडचणींना धावून जाणारे अरविंद ठाकरे
समाज कार्यात आपली परिसरात वेगळी ओळख निर्माण करणारे अरविंद ठाकरे यांनी सरपंच पदावर रुजू होताच पहिल्याच दिवशी गावातील पथ दिव्यावरील बंद असलेले लाईट स्वखर्चाने चालू केले. गावातील नाल्याची सफाई केली. इतकेच नव्हे तर कुंभा फाट्या पासून गावा पर्यंत जाणाऱ्या रस्ताच्या बाजूला असलेले झाडे झुडपे साफ करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून रस्ता दुपदरी केला. गावातील होतकरू खेळाडूंना खेळण्या योग्य मैदान तयार केले. गावा बाहेर टाकळी रस्त्यावर असलेले एका पान मंदिरचा रस्ता साफ करून जाण्या योग्य निर्माण केला.
हे देखील वाचा: