कुर्ली ग्राम वि.का.स. संस्थेची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी नानाजी सूर, उपाध्यक्षपदी प्रितम बोबडे

0

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कुर्ली ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. बिनविरोध पार पडलेल्या या  निवडणुकीत अध्यक्षपदी नानाजी सूर तर उपाध्यक्षपदी प्रितम लक्ष्मण बोबडे यांची सर्वानुमते निवड झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कुर्ली : संचालक मंडळ

तर सदस्य म्हणून जनार्दन बोबडे, महादेव रणदिवे, संजय आत्राम, कलावती पंधरे, विठ्ठल सुरपाम, रुपचंद ढेंगळे, रुंदा आसुटकर, रामदास बोबडे, शारदा बोबडे, देवराव उलमाले यांची निवड करण्यात आली.सदर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी शांतीलाल जैन, मुरलीधर ठाकरे, लुकेश्वर बोबडे यांनी सहकार्य केले. निवडणूक अधिकारी म्हणून एस.पी.बकाले यांनी काम पाहिले. संस्थेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सरपंच विठ्ठलराव बोन्डे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.