जितेंद्र कोठारी, वणी: ठेका पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांना रोजंदारीने (डेली वेज) काम करण्यास सांगितले म्हणून तिघांनी कंपनीच्या मॅनेजरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजूर कॉलरी येथे 28 ऑक्टो. रोजी ही घटना घडली. या घटनेबाबत फिर्यादी ईशान मिनिरल्स प्रा. लि. कंपनीचे मॅनेजर सचिन कृष्णमाने सिन्हा (44) रा. राजूर (कॉ.) यांनी 29 ऑक्टो. रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ईशान मिनिरल्स कंपनीत 14 मजूर कॉन्ट्रॅक्ट पद्धत्तीवर काम करीत होते. परंतु कंपनीला ठेका पद्धत परवडत नसल्याने त्यांनी मजुरांना रोजमजुरी हिशोबाने काम करण्याचे सांगितले. दि. 28 ऑक्टो. रोजी सकाळी 11.30 वाजता दरम्यान फिर्यादी कंपनी कार्यालयात हजर असताना काही मजूर राजूर येथील अरबाज खान (32) याला सोबत घेऊन आले.
कामगारांपैकी किसन सुरेश किनाके (23) व गजानन रामदास शेंडे (32) रा. राजूर (इजारा) या दोघांनी मॅनेजर सचिन सिन्हा यांना तुम्ही आम्हाला ठेक्याचे काम सोडून रोजमजुरी का दिले? असे म्हणत वाद घालत शिवीगाळ केली. कामगारांशी बोलत असताना आरोपी अरबाज खान याने फिर्यादीची कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू आम्हाला ठेका कामावर घेतले नाही तर तुला पाहून घेईल, अशी धमकीही तिघांनी दिली.
फिर्यादी मॅनेजर सचिन कृष्णमाने सिन्हा रा. राजूर यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी अरबाज खान, किसन किनाके व गजानन शेंडे तिघं रा. राजूर विरुद्ध कलम 34, 448, 504, 506 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा:
Job Alert: वणीतील लेंसकार्ट (Lenskart) आउटलेटमध्ये नोकरीची संधी
Comments are closed.