अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीच्या आईला अटक

कामानिमित्त बाहेरगावी जातो सांगून पतीने काढला पळ

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देणे व ती गर्भवती असल्या कारणावरून मुलीच्या आई व पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीच्या आईला अटक करण्यात आली आहे तर पतीचा शोध मारेगाव पोलीस घेत आहे. 

Podar School 2025

आरोपी हा नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील रहिवासी असून तो दोन वर्षांपूर्वी मारेगाव तालुक्यात आला होता. तो एका गावात तात्पुरत्या स्वरूपातील झोपडी करून राहत होता. त्याने 18 जुलै 2022 रोजी गावातीलच एका 11 वर्षीय मुलीशी लग्न केले. लग्नानंतर मुलगी गर्भवती राहिली. दरम्यान काही दिवसांसाठी कामानिमित्त बाहेर गावी जात असल्याने कारण सांगून पतीने मुलीला माहेरी पाठवले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुलगी 4 महिन्याची गर्भवती राहिली. त्यामुळे मुलीच्या आईने मुलीला दवाखान्यात नेले असता सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेले. मारेगाव पोलिसांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करत अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्या प्रकरणी पीडितेची आई व पतीविरोधात बाल लैंगिक अत्याचार, बालविवाह प्रतिबंधक कायदा, रेप यानुसार गुन्हा दाखल केला. 

सध्या मुलीच्या आईला अटक करण्यात आली असून पोलीस पतीचा शोध घेत आहे. दरम्यान  मारेगांव पो.स्टे. ठाणेदार राजेश पुरी, पो ना. अजय वाभिटकर करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.