भास्कर राऊत, मारेगाव: घोडदरा येथील कुमारिका सायंकाळी शौचासाठी बाहेर गेली असता गावातीलच एकाने हात धरून ओढत नेऊन विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने आपबीती घरच्यांना सांगितल्यानंतर मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
मारेगाव तालुक्यात खून, मारामारी, बलात्कार, आत्महत्या तसेच विनयभंग या घटना जवळजवळ नित्याच्याच झाल्या आहेत. अशीच घटना घोडदरा येथे घडली. येथील एक 15 वर्षीय कुमारिका सायंकाळच्या वेळेस शौचास बाहेर गेली होती. त्यावेळी गावातीलच अभिषेक विलास चांदेकर वय 22 वर्षे हा तिच्या मागावर होता. ती गावाच्या बाहेर दिसताच त्याने तीला गाठले. आणि तिचा हात धरून अश्लील चाळे करू लागला.
मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण तू माझ्याशी बोलत नाही. मला तुझ्याशी बोलायचे आहे. असे म्हणून हात पकडला. आरडाओरडा केला तर मी तुला सोडणार नाही अशी धमकी देत आरोपी तिला जवळच्या एका शेतातील नाल्याजवळ नेले. दरम्यान पीडितेने बचाव करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान ही घटना आरोपीच्या घरच्यांना माहिती झाली. तसेच रात्री होत आल्याने त्याच्या वडिलांनी पीडितेला घराजवळील नाल्याजवळ आणून ठेवले. पीडितेने घरी गेल्यावर आपबीती सांगितली. यावरून घरच्यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे देखील वाचा:
विद्युत पुरवठा पूर्ववत करताना करंट लागून कामगाराचा दुर्दैवी मृ्त्यू
Comments are closed.