अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात… मुलगी 3 महिन्याची गर्भवती

विवेक तोटेवार, वणी: प्रेम संबंध जुळवून एका अल्पवयीन मुलीचे शोषण करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. वणीत ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

Podar School 2025

आरोपी पवन गणेश मेश्राम (24) रा. खडबडा वणी येथील रहिवासी आहे. त्याचे शहरातील एका अल्पवयीन मुलीशी सूत जुळले. पीडितेच्या बहिणीचे लग्न झालेले आहे. ती देखील वणीतच राहते. त्यामुळे पीडिता ही तिच्या बहिणीच्या घरी जायची. अशीच एकदा बहिणीच्या घरी गेली होती. त्या वेळी आरोपी देखील त्या घरी गेला. तिथे त्याने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. काही दिवसानंतर पीडिता ही गर्भवती असल्याचे कळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे कळताच तिच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व याबाबत तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 376, 2 (N), सहकलम 4,5 पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोउनि आशिष झिमटे यांनी तक्रार मिळताच तात्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.