वणीत सोमवारी श्री नंदेश्वर देवस्थान येथे श्रद्धांजलीसभेचे आयोजन

दिवंगत रुधाजी पाटील देरकर तथा दिवंगत बापूराव पाटील पानघाटे यांच्या स्मृतींना मिळेल उजाळा

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:-  माजी आमदार बापूराव पाटील पानघाटे आणि रूधाजी पाटील देरकर या समाजधुरीणांचे वणी येथे अलीकडे निधन झाले. वणी, मारेगाव व झरी तालुक्यांतील शोकाकुल नागरिकांतर्फे सोमवार दि. 30 एप्रिलला श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वरोरा रोड येथील श्री नंदेश्वर देवस्थान येथे सायंकाळी 6.30 वाजता ही श्रद्धांजली सभा होईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

किसान प्रसारक समितीचे व जगन्नाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष दिवंगत रुधाजी पाटील देरकर यांचे दि. 11 एप्रिलला तर माजी आमदार तथा राष्ट्रीय शिक्षण संस्था व धनोजे कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष  दिवंगत बापूराव पाटील पानघाटे यांचे दि. 19 एप्रिलला देहावसान झाले. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रध्दांजली सभेत नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.