रंगनाथनगर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात काम करतील युवक

1

जब्बार चीनी, वणी: रंगनाथनगर येथील युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला. रा. कॉं.चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्त्वात ही तरुणाई काम करणार आहे. निखील धर्मा ढुरके, नीलेश दुर्गे, अमोल दुर्गे, समीर खान, रोहीत दुर्गे या युवकांनी पक्षप्रवेश केला आहे.

Podar School 2025

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या उद्देशाने राष्ट्रवादी कामाला लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. महेंद्र लोढा हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी वीजेची, पथदिव्यांची व्यवस्था केली. लोकसहभागातून अथवा स्वबळावर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मदत केली. अनेक अडल्यानडल्यांना ते नेहमीच मदत करतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांचीच प्रेरणा मिळाल्याचं निखील धर्मा ढुरके, नीलेश दुर्गे, अमोल दुर्गे, समीर खान, रोहीत दुर्गे यांनी सांगितलं. युवकांचे ते आदर्शही आहेत, असं या युवकांनी सांगितलं. समाजासाठी काहीतरी करता यावं, या हेतुने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

युवक म्हणजे देशाची ऊर्जा आहेत
युवक म्हणजे देशाची ऊर्जा आहेत. त्यांच्यात कार्य करण्याची कमालीची क्षमता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष युवकांना त्यांच्या क्षमता वापरण्याची पूर्ण संधी देते. युवकांनी इतिहास घडवला आहे. हे युवक स्थानिक आहेत. त्यांना इथल्या अडी-अडचणींची, समस्यांची जाणीव आहे. त्यांच्या कार्याला पक्षातून नक्कीच दिशा मिळेल. आम्ही सर्व त्यांच्या सोबतच आहोत.
डॉ. महेंद्र लोढा,
प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, महाराष्ट्र राज्य.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.