जब्बार चीनी , वणी : येथील लायन्स क्लब ऑफ वणी लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजअंतर्गत स्वतःच्या घरी ऑक्सिजनची गरज असणाया रुग्णांना अत्यल्प भाडेतत्त्वावर रुग्णसेवा म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीनची रुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे.
हा ऑक्सिजन सिलिंडरचा पर्याय असून , ज्यात ऑक्सिजन स्वतः तयार होतो. या मशीनची वैशिष्ट्य म्हणजे या मशिनची क्षमता एक ते पाच लिटर प्रतिमिनिट आहे . हाताळण्यास अगदी सुलभ , रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता पडत नाही . मशिनला रिफील करण्याची आवश्यकता नाही गरजू रुग्णाला डिपॉझिट ५००० रुपये , डिपॉझिट परत केली जाईल .
प्रतिदिवस ४०० व २०० रुपये सेवादर प्रतिदिन द्यावी लागेल ही सेवा केवळ वणी शहराकरिता राहील . उपकरण वापरण्याकरिता रुग्णाकडे डॉक्टरांचा लेखी वैद्यकीय सल्ला असणे आवश्यक राहील . या उपकरणाचा उपयोग आयसीयू च्या रुग्णांसाठी होऊ शकत नाही .
गरजूंनी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 8999681524 , 8888797938 , 8421137280 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा , असे आवाहन लॉयन्स क्लब ऑफ वणीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे .
लायन्स स्कूलची शैक्षणीक शुल्कात पन्नास टक्के कपात
वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट व्दारा संचालित लायन्स इंग्लिश मिडिअम हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या शालेय व्यवस्थापन समितीने स्वतः पुढाकार घेउन , इयत्ता नर्सरी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या पालकांची टप्प्या – टप्याने सभा घेउन कोविड -19 विषाणू आपत्तीमुळे उदभवलेल्या पालकांच्या आर्थीक अडचणींचा जाणीवपूर्वक विचार करून
विद्यार्थ्यांनी न वापरलेल्या सुविधांना विचारत घेऊन , शाळेने 2020-21 या सत्रासाठी शुल्क कपात करून शैक्षणीक शुल्क 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे सर्व पालकांनी शाळा समितीच्या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत करून आभार मानले.
कोविड -19 च्या आपत्तीमुळे शालेय सत्र नियोजीत वेळी सुरू न झाल्यामुळे लायन्स शाळेने शासन निर्देशाचे पालन करून नर्सरी ते बारावीच्या विद्याथ्यांचे ऑनलाईन ग्रुप तयार करून त्यांच्या साठी ऑनलाईन वर्ग सुरू केले,
तसेच कुणी शाळेची फीस भरली नाही म्हणून कोणत्याही विदयार्थ्यास शिक्षणापासून वंचित न ठेवला सर्व विद्यार्थी व वर्गाचा अभ्यासक्रम ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून पूर्ण केला. तसेच विद्यार्थ्यांच्या वर्ग चाचण्या व सत्र परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आल्या.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा