अन… जेवण करीत असतानाच त्यांच्यावर काळाचा घाला

खानावळीत जेवण करताना ह्रदयविकाराचा धक्क्याने वृद्ध इसमाचा मृत्यू

भास्कर राऊत मारेगाव : सोमवार 3 ऑक्टो. रोजी दुपारच्या वेळी मारेगाव शहरात नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ सुरु असते. अनेकजण आपल्या कामात व्यस्त होते. अशातच अंदाजे 60 वर्ष वयातील एक वृद्ध व्यक्ती मेन चौकामध्ये असलेल्या एका खाणावळीमध्ये जेवण करायला येतो. जेवणाची ताट आल्यावर तो लगेच जेवणाला सुरवात करतो. दोन घास जेवल्यानंतर तिसरा घास घेताच त्या वृद्धाला हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्याच्या मृत्यू झाला.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की, मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील भास्कर दौलत वेले (60), हे न्यायालयीन कामानिमित्त सोमवारी सकाळी मारेगाव येथे आले होते. दुपारी आपले काम आटोपून शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या एका खाणावळीमध्ये ते झुणका भाकर खात होते. दोन तीन घास तोंडात घेतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि ते खुर्चीवरून खाली कोसळले. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अविवाहित असलेले भास्कर वेले हे वेगाव येथील माजी उपसरपंच होते. मोजके बोलणारे आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्व अचानक अशा पद्धतीने जीवनातून एक्झिट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

हे देखील वाचा – 

Comments are closed.