एका लग्नाची ही निराळीच गोष्ट, अनाथ मुलीच्या लग्नात गहिवरले वऱ्हाडी….

तान्हा पोड येथील निराधार मुलीला मिळाला मायेचा आधार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तिला आई-वडील नव्हते. लग्नाचं वय झालं. एवढा खर्च कोण करणार, हा तिच्यापुढे प्रश्न. ते दामप्त्य तिचे आई-वडील झाले. आपल्या सासरी जाताना तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. या लग्नाची गोष्टच निराळी होती. तिला निरोप देताना जणू अख्खं गावच तिचे माय-बाप झाले. लग्नाला उपस्थित सगळेच वऱ्हाडी गहिवरले. सुचिताचं लग्न केवळ त्या वस्तीसाठीच नव्हे तर गावासाठीदेखील जिव्हाळ्याचा विषय झाला. तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिताच्या आयुष्यात नव्या स्वप्नांची पेरणी गावाने केली.

Podar School 2025

कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला आहे. तर दुसरीकडे काही लोक अजुनही माणुसकी जिवंत असल्याची अनुभूती देत आहेत. तालुक्यातील तान्हा पोड या कोलाम वस्तीत आईवडीलाविना पोरक्या असलेल्या सुचिता नामक नववधूला आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षाची असताना तिच्या वडीलांनी कर्जबाजारी झाल्याने आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आजारी आइनेही देह त्यागला. खेळा-बागडायच्या वयातच तिच्यावर वृध्द आजीआजोबा आणि दोन लहानग्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली.

स्वत:ला सावरत सुचिताने समाजासमोर आदर्श निर्माण केला. मुलगा व सून तारुण्यात गेल्याने खचलेल्या आजीआजोबांना तिने जगण्याचं बळ दिलं. लहान भावंडांना शासकीय आश्रमशाळेत टाकून शिक्षण दिलं. ती मात्र गावाच्या शाळेबाहेर शिक्षण घेऊ शकली नाही.

भावंडं आणि आजीआजोबा यांना सांभाळतानाच ती २१ वर्षांची उपवर झाली. तिचे संस्कार पाहून तिला लग्नासाठी मागणी होऊ लागली. परंतु जिथे एकवेळच्या जेवणाची ददात, तिथे लग्न सोहळा कसा करणार हा प्रश्न गावासह सुचिताला ही भेडसावू लागला.

गावातील काही लोकांनी ही गोष्ट या भागाच्या पंचायत समिती सदस्य सुनिता लालसरे व त्यांचे पती यांच्या कानावर घातली. त्यांनी गावकाऱ्यांशी विचारविनिमय करुन सुचिताचे केळापूर तालुक्यातील खैरी येथील सुरेश रघुजी आत्राम नामक तरुणाशी विवाहगाठ बांधली.

लग्न सोहळ्याचा बराचसा खर्च लालसरे दांपत्याने उचलला. ती विवाह बंधनात अडकून पती सोबत सासरला निघून गेली. त्यावेळेस अख्ख गाव हुंदके देऊन रडत होतं. ती मात्र जातानाही मागे परतून पाहत होती. माणुसकी धावून आली याची प्रचिती तिला व सर्वांनाच आली. शंकर लालसरे व सुनीता लालसरे यांनी अनाथांचे माय-बाप होऊन लग्न लावून दिले.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट तर्फे सुरक्षा किटचे वाटप

 

Leave A Reply

Your email address will not be published.