पंचायत समिती कार्यालयाला भीषण आग

आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक...

जितेंद्र कोठारी, वणी: पंचायत समितीच्या कार्यालयाला आज रात्री 8.30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवून आटोक्यात आणली मात्र आग इतकी भीषण होती की त्याची धग ब-याच वेळानंतरही सुरूच होती. घटनेची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. 

तहसिल कार्यालयाजवळील शिक्षण विभागाला लागून असलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या एका कक्षाला आग लागली. या कक्षात तालुका व्यवस्थापन, उमेद अभियान, पशू संवर्धन विभागाचे काम चालायचे. सदर कार्यालय हे हायवेच्या बाजूलाच असल्याने आग लागल्याचे तात्काळ लक्षात आले. याची माहिती त्वरित अग्निशमन दलाला देण्यात आली.

अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. कार्यालयासमोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुकानांचे अतिक्रमण असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यास चांगलीच कसरत करावी लागली. मात्र काही वेळातच आग आटोक्यात आणली गेली. आगीच धग अद्यापही धुमसत आहे (9.30वा.). या आगीत फर्निचर तसेच महत्त्वाचे कागदपत्र/ शासकीय दस्तावेज जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी झाली होती. 

बीडीओंच्या सेवानिवृत्तीच्या तीन दिवस आधी आग
पंचायत समितीचे बीडीओ हे येत्या 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहे. शनिवार व रविवार कार्यलय बंद आहे. त्यांच्या सेवेचा अवघा एकच दिवस बाकी होता. मात्र त्याआधीच कार्यालयाला आग लागली. या आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीचे मोठे नुकसान झाले आहे. बीडीओंच्या सेवेचा शेवटचा काळ अशा दुर्घटनेने झाला आहे. 

नुकतेच मनसे यांनी सर्व शासकीय व खासगी कार्यालय, रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी निवेदन देखील सादर केले होते.

गंगुबाई काठियावाडी वणीत सुजाता थिएटरमध्ये रिलीज…

थरार…. अन् वाघाची शिकारीसाठी थेट शेतातच एन्ट्री

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.