झरी पंचायत समितीत सामाजिक न्याय दिन साजरा

0

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीच्या सभागृहात राजश्री शाहू महाराज जयंती व  सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. समता दिंडीद्वारे गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

भारतीय राज्यघटनेने लोकशाही ही संकल्पना स्वीकारली असली तरी सामाजिक न्याय जोपर्यंत समाजात निर्माण होत नाहीत तोपर्यन्त लोकशाही ही अधुरीच असते. तर आरक्षण हे त्याच उद्देशाने निर्माण झाले आहेत. त्याची सुरुवात राजश्री शाहू महाराजाने सुरवात केली आहे.

आज अनेक योजना शासनस्तरावरून राबविल्या जातात. आरक्षण, शिक्षण ,वसतिगृहे आणि शोषितांसाठी अनेक योजना व कार्य राजश्री शाहू महाराजांनी त्या काळात राबविले होते. त्याचे अनुसरण आज करण्याची गरज भावी पिढीला असल्याचे यावेळी मान्यवरांनी शालेय विद्यार्थ्यांना व उपस्थिताना सामाजिक न्याय दीना निमित्त आयोजित  कार्यक्रमा दरम्यान सांगण्यात आले.

यावेळी झरी गावात स्थानिक राजीव माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याद्वारे ‘ समता दिंडी’ रॅली दरम्यान जनजागृती करण्यात आली. यावेळी तहसिलदार आर. बी. खिरेकर, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, सह गटविकास अधिकारी शिवाजी गवई, मुख्याध्यापक मोहन पडलवार, गटशिक्षणाधिकारी हाडोळे, पंचायत समिती सभापती लता आत्राम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी इसाळकर यांनी केले. विद्यार्थ्यांसह संदलवार, भोयर,लॅक्सट्टीवार आदी शिक्षक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.