भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील एका अविवाहित तरुणीने शुक्रवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली.
मृत तरुणी शिवानी महादेव रामपुरे (19) ही कुंभ्याजवळील रामपूर येथील रहिवाशी होती. शिवाणीने शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस विषारी कीटकनाशक प्राशन केले. ही घटना माहीत होताच घरच्यांनी शेजारच्यांच्या मदतीने तिला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र तरुणीची तब्येत खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आज उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. शिवानीच्या मृत्यूचे नेमके कारण कळले नाही. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
हे देखील वाचा:
Comments are closed.