मुकूटबन येथे जोरदार पावसातही भरला पोळा

प्रथम बक्षीस कल्लूरवार तर द्वितीय उल्हास मंदावार यांच्या बैलजोडीला

0
सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. मुकूटबन येथे दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचयातने पोळा सणानिमित्त आकर्षक सजावट, सुंदर देखावा ,चांगली बैलजोडी व इतर गोष्टीवर विशेष बक्षिसे ठेवण्यात आले होते. तसेच पोळ्यातील बैलजोडीच्या परीक्षण करण्याकरिता पोळा समितीची सुद्धा स्थापन करण्यात आली.
समितीमध्ये गावातील शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्ती समाविष्ठ होते. दरवर्षी प्रमाणे मुकूटबनवासी पोळा पाहण्याकरिता व शेतकरी सायंकाळी आपली बैलजोडी सजवून बसस्टँड वर जमा झाले. पूजा अर्चना झाली थोड्या वेळात पोळा फुटणार तेवड्यातच जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे अर्धा तास पोळ्यावर विरजण पडले. पोळा बघण्याकरिता आलेले लहान मुलासह सर्वच गावकरी व बैलजोडी घेऊन आलेले शेतकरी पाण्याने पूर्ण ओलेचिंब झाले.
पोळा समितीने सजावट करून आलेल्या बैलजोडीचे परीक्षण केले त्यात प्रथम बक्षीस ७००१ रुपये हनुमान कल्लूरवार याला देण्यात आले तर द्वितीय उल्हास मंदावार ५००१,तृतीय बक्षीस गंभीर जींनावार, चतुर्थ बक्षीस दासू तिप्रतिवार याना देण्यात आले. त्यावेळी सरपंच शंकर लाकडे,उपसरपंच अरुण आगुलवार,सुधाकर आसुटकर, मधुकर गादेवार, चक्रधर तिर्थगिरीकर,भूमरेड्डी बाजनलावार,ठाणेदार धर्मराज सोनुने,मधुकर चेलपेलवार,बापूराव पुल्लीवार,बापूराव जींनावार,डॉ भोयर,गजानन अक्केवार,रामा संदरलावार, गजानन उत्तरवार, श्रीहरी बरशेट्टीवार, सत्तार गुरुजी, दीपक बरशेट्टीवार,  सह गावकरी उपस्थित होते. पोळ्याच्या ठिकाणी  कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.