मारेगाव तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेला घरघर

अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

भास्कर राऊत, मारेगाव: पंतप्रधान ग्राम सडक योजनेला घरघर लागलेली असून तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा हा मार्ग शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. बोटोनी, कुंभा, सिंधी, देवाळा,मार्डी, चोपण ,शिवणी, हिवरा,वनोजा देवी , आकापूर, गौराळा इत्यादी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. मात्र तरी संबंधित प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

Podar School 2025

मोठा गाजावाजा करीत मारेगाव तालुक्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे काम करण्यात आले. काम करीत असतानाच काम योग्य पद्धतीने न झाल्याने कामाचे काही दिवसानंतर काम उखळायला लागले होते. काम उखळले तरीही अधिकाऱ्यांनी योग्य लक्ष न दिल्याने त्याचे परिणाम कामावर झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या कामाच्या काही दिवसातच काम मोठया प्रमाणात उखळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यातील बोटोनी, कुंभा, सिंधी, देवाळा,मार्डी, चोपण ,शिवणी, हिवरा,वनोजा देवी , आकापूर, आणि गौराळा अशा मोठया प्रमाणात या पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. परंतु कामाच्या सुरुवातीपासूनच या कामाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराने काम योग्य पध्दतीने न करता थातुरमातुर उरकविले. दोन तीनदा या रस्त्याचे दुरुस्तीचे कामही करण्यात आले. परंतु एकीकडे काम सुरू तर दुसरीकडे उखळणे सुरू अशी अवस्था या रस्त्यांची होती.

याविषयी प्रसार माध्यमातून वेळोवेळी बातम्या देखील प्रकाशित करण्यात आल्या होत्या. परंतु निगरगट्ट प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे याकडे लक्ष दिल्या गेले नाही. सध्या या रस्त्याची सर्वत्र पडझड झालेली आहेत. आकापूर येथे तर संपूर्ण रस्ताच फुटलेला आहेत. जास्त जर पाऊस झाला तर कदाचित गावांमध्येही पाणी शिरू शकते या भीतीमध्ये नागरिक वावरतांना दिसत आहेत.

पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे रस्ते एवढया मोठ्या प्रमाणात फुटले तरीही याकडे कोणताही अधिकारी येऊन पाहायला तयार नाही. या रस्त्याच्या कामाचे उन्हाळ्यातच काम करण्यात आले होते. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झालेले कामही लवकरच उखडले. सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

Comments are closed.