कवी प्रदीप बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
जितेंद्र कोठारी, वणी: येथील कवी प्रदिप आनंदराव बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन केल्याबद्दल प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, महिला आघाडी पुणे तर्फे 1 जून रोजी आयोजित काव्य लेखन स्पर्धेत प्रदीप बोरकुटे यांनी ‘घे गगन भरारी’ या विषयावर काव्य लेखन साहित्यिक सहभाग नोंदवला होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे संस्थापक शरद गोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडी पुणे तर्फे काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र येथील नामवंत कवी व साहित्यक यांनी सहभाग नोंदवीला होता. उत्कृष्ट काव्यलेखन करुन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले प्रदीप बोरकुटे यांचे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आले.
यावेळी विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे, विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष संगीता बाबोळे, सरचिटणीस ललिता वसाके, परीक्षक कल्पना अबुलकर, संयोजिका वंदना राऊत, स्नेहा मोरे, कल्पना टेंभुर्णीकर उपस्थित होते.
हे देखील वाचा: