वणीत LIC च्या अभिकर्त्यांचे कार्यालयासमोर आंदोलन

विविध प्रलंबित मागण्यांसाठी विमा एजन्ट्स आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जीवन विमा निगमच्या अभिकर्त्यांच्या विविध मागण्यासाठी वणीत विमा अभिकत्यांतर्फे सोमवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी शहरातील एलआयसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. लाईफ इंश्योरन्स एजन्ट असोसिएशनतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विमा अभिकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला. विविध मागण्यांसाठी सध्या विमा अभिकर्त्यांतर्फे देशव्यापी असहकार आंदोलन राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वणीत देखील हे आंदोलन करण्यात आले.

पॉलिसी धारकांचा बोनस वाढला पाहिजे, कर्जाचे, लेट फीचे व्याजदर कमी करावे, विमा हप्त्यांवरील जीएसटी मागे घ्यावा, विमा प्रतिनिधींच्यासाठी वेल्फेअर फंड तयार करावा, विमा प्रतिनिधींच्या मॅच्युरिटीमध्ये वाढ करावी, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढवून घ्यावा, प्रतिनिधींना न्याय, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळाला पाहिजे, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी लागू करावा, सीएलआय चॅनलचा विकास करावा या व इतर मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी लाईफ इंश्योरन्स एजन्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष भगवान इंगळे, सचिव योगेश पोद्दार, उपाध्यक्ष मारोती महारतळे, कोषाध्यक्ष वसंत थेटे, यांच्यासह शहर व परिसरातील विमा अभिकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही…. विविध धाडीत 24 खर्रे जप्त…

आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

जाधव सर्जिकल क्लिनिकचे थाटात उद्घाटन

Comments are closed.