क्रुझरला कट मारल्याच्या कारणावरून राडा

दोन्ही पार्टीतील 11 आरोपींवर गुन्हा दाखल

0

नागेश रायपुरे, मारेगाव: क्रूझर वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून मारेगाव येथील बसस्टॉपवर मारेगाव व बाभूळगाव येथील दोन्ही गटातील 11 युवकांमध्ये लाठी काठीने चांगलाच राडा झाला. या प्रकरणी मारेगाव पोलिसात दोन्ही गटातील युवकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोन्ही गटाच्या 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यात पहिल्या पार्टीतील बाभूळगाव येथील आरोपी जुबेर खान मोहमद खान पठाण (24), अल्ताफ खान हमीद खान पठाण (23), अबरार खान सुजेत खान पठाण (23), अमोल सुनील उईके (23), शुभम रमेश आसकर (24), जुबेर खान जाहेद खान पठाण (23) व एक विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालक तसेच दुसऱ्या पार्टीतील मारेगाव येथील सूरज गणपत वाढई (26), अतुल निखाडे (40), मनोज काकडे (40) व रॉयल शबीर सय्यद (25) असे राडा करणाऱ्या दोन्ही गटातील आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांच्या प्राप्त माहितीनुसार मारेगाव येथील (MH 29 BC 2397) हे क्रूझर चारचाकी वाहन करंजीवरून मारेगाव येथे येत असताना येथील बस स्टॉपवर मागून येणारे बाभूळगाव येथील क्रूझर वाहन MH 29 BP 0839 वाहनातील 7 युवक वाहनाच्या खाली उतरून तसेच मारेगाव येथील क्रूझर वाहनातील 4 युवकसुद्धा महामार्गावर कट का मारला, या कारणावरून लाठीकाठीने राडा करत होते.

दरम्यान वणी येथील वाहतूक शिपाई महेश राठोड व मारेगाव येथील पो.जमादार आनंद अचलेवार हे नाकाबंदी दरम्यान कर्तव्यावर होते. दोन्ही पार्टीतील युवकांमध्ये राडा चालू असताना हे घटनास्थळी पोहचले. वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता यात बाभूळगाव येथील आरोपी जुबेर खान मोहम्मद खान पठाण हा दारू पिऊन आरडाओरडा करत दोन्ही पोलिसांच्या अंगावर मारण्यासाठी चवताळून आला. ये हमारा आपस का मॅटर है तुमको क्या करना है असे म्हणत शहरातील शांतता भंग करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी दोन्ही पार्टीतील 11 आरोपींवर कलम 143,147, 149,160, 186,188, 269,270, 271, भादंवि सहकलम 135, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच सहकलम 2,3,4 साथ रोग प्रतिबंधक अधिनियम व कोविड 19 उपाय योजना अधिनियम 2020 नियम 11 तसेच कलम 85(1) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अनव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत.

बाभुळगाव येथील युवकांनी पोलीस स्टेशनमध्येसुद्धा पोलिसाना न जुमानता फिल्मी स्टाईल आरडा ओरडा करत राडा केला. सदर युवक यवतमाळ येथील एका गॅंगस्टरचा दावा करत चक्क पोलीस स्टेशन मध्येच गुंडागर्दी करत होते. हे दृश्य बघण्याकरिता लोकांनी एकच गर्दी केली होती.

हेदेखील वाचा

 विश्वामित्र बारला ठोकले सील

हेदेखील वाचा

मारेगाव तालक्यात आज 9 पॉझिटिव्ह, तर 40 कोरोनामुक्त

 

आज शहरात अवघा 1 रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने खाली

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.