खनिज तस्करांच्या रडारवर कोळसा खाणीतील ओबी मटेरियल

घोन्सा व कुंभारखनी ओपनकास्ट खाणीच्या ओबीआरची चोरट्या मार्गाने वाहतूक व विक्री

जितेंद्र कोठारी, वणी: गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीवर आकारण्यात येणाऱ्या रॉयल्टीच्या दरात शासनाने दीडपट वाढ केली आहे. त्यामुळे खनिज चोरट्यांनी डब्ल्यूसीएलच्या ओपनकास्ट कोळसा खाणीतून निघणाऱ्या ओबीआर (Over Burden Remove) मटेरियल चोरीकडे आपला मोर्चा वळविला आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील कुंभारखनी व घोन्सा खुल्या खदानीतून ओबीआर मटेरियलची मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वणी शहरात वाहतूक होताना दिसत आहे.

Podar School 2025

शहरात अनेक ठिकाणी सुरु बांधकाम साईडवर मध्यरात्री पासून तर पहाटेपर्यंत हायवाने विना परवाना ओबी मटेरियल टाकण्यात येत आहे. काही खनिज तस्कर व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी डब्ल्यूसीएलच्या अधिकाऱ्यांना व सुरक्षा रक्षकांना हाताशी धरून हा गोरखधंदा सुरु केल्याचे बोलले जात आहे. विना परवाना सर्रास धावणाऱ्या या हायवा वाहनांकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे फुकट मिळणारा ओबी मटेरियल विकून खनिज तस्कर मालामाल होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

इमारतीचा जोता तयार करण्यामध्ये व इतर ठिकाणी भर भरण्यासाठी वापरण्यात येणारी मुरुम या गौण खनिजाचे भाव 1800 रुपये प्रति ब्रास पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदारांनी कोळसा खाणीच्या ओबीआरचे पर्याय शोधले आहे. भूगर्भातील कोळसा उत्खनन करण्यासाठी भूपृष्ठावरील माती, मुरूम, दगड खोदून डम्पिंग केले जाते. ओपनकास्ट कोळसा खाणीच्या बॅक फिलिंगसाठी या ओबी मटेरियलचा वापर केल्या जाते. मात्र भ्रष्टाचाराने पोखरलेल्या डब्ल्यूसीएल प्रशासनाने आता ओबी विकून खाण्याचा प्रताप सुरु केल्याचे दिसून येत आहे.

विना रॉयल्टी वाहतूक इलिगल – ना. तहसीलदार
कोळसा खाणीचे ओबीआर गौण खनिज श्रेणीत समाविष्ट असून विना रॉयल्टी व वाहतूक परवान्याशिवाय वाहतूक करणे दंडनीय आहे. तसेच रात्रीच्या वेळी गौण खनिज वाहतूकीवर प्रतिबंध आहे.
– रामचंद्र खिरेकार, नायब तहसीलदार वणी

हे देखील वाचा:

Comments are closed.