वरली मटका अड्ड्यावर धाड, 11 शौकिनांना अटक

मोबाईल व दुचाकीसह पावणे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

जितेंद्र कोठारी, वणी: शहर पोलीस डीबी पथकाने शहरातील वीर सावरकर चौक परिसरात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर धाड टाकून 11 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही मंगळवार 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजता दरम्यान करण्यात आली.

शहरातील सावरकर चौक भागात सादिक अब्दुल हमीद यांच्या घराच्या वरच्या खोलीत मोबाईलवरती वरली मटका जुगार (सट्टा मटका) सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलीस पथकाने सदर घरावर रेड केली असता 7 इसम मोबाईल फोनवरून मटक्याचे आकडे घेऊन कागदावर उतारा घेत असताना मिळाले.

पोलिसांनी अकबर हनिफ शेख (34) रा. शास्त्रीनगर वणी, मोहसीन राजु शेख (23) रा. एकतानगर वणी, दिपक शंकर गांडलेवार (24) रा. रंगनाथनगर वणी, नावेद आरीफ शेख (28) रा. सैलानी हॉस्पीटल जवळ वरोरा जि. चंद्रपुर, राहुल किशोर गांवडे (26) रा. शास्त्रीनगर वणी, शेख गफार शेख सत्तार (34) रा.शास्त्रीनगर वणी व अकरम अकबर बेग (32) रा.शास्त्रीनगर वणी या 7 इस्माना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी घरमालक सादिक शेख हमीद शेख (30) रा. सावरकर चौक वणी याने समीर शेख हसन शेख रा. वणी, सुशील मदनकुमार अग्रवाल रा. तुमसर जि. भंडारा ह.मु. एकतानगर वणी व मुस्तफा खान मुसा खान (19) रा. शास्त्री नगर याच्या सांगण्यावरून वरली मटका उतारा घेत असल्याची कबुली दिली.

ताब्यातील आरोपींच्या कबुलीवरून पोलिसांनी घरमालक सादिक शेख हमीद शेखसह इतर तिघांनाही अटक केली. वरली मटका अड्ड्यावर धाडी दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 3290 रुपये रोख, 16 मोबाईल हँडसेट किंमत 1,49,000 रु., मोटारसायकल 2 नग किंमत 120000 रु. व इतर साहित्य किंमत 2050 रु. असे एकूण 274340 रुपयांचे मुद्देमाल जप्त केला.

आरोपींविरुद्ध कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा व कलम 188, 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ दिलीप पाटील भुजबळ, अपर पो.अ. खंडेराव धरणे, उप वि.पो.अ. संजय पूज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, पोऊनि गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, हरींदर भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, दीपक वाडर्सवार व मपोका प्रगती काकडे यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

वणीतील सनराईज स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू

विवाहित महिलेचा भर रस्त्यात विनयभंग

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.