विवाहित महिलेचा भर रस्त्यात विनयभंग

अज्ञात आरोपीचा शोध सुरू

0

विवेक तोटेवार, वणी: माहेरहून परत येत असताना एका विवाहित महिलेचा एका मुलाने रस्त्यात विनयभंग केला. बेलदारपुरा  येथे सोमवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला (35) ही विवाहित असून ती आईच्या घरी गेली होती. शहरातील माहेर कापड केंद्रा मागील रस्त्याने ती तिच्या घरी परत चालली होती. संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान महिलेच्या मागून एक तरुण आला व महिलेच्या शरीराशी लगट करून तिथून पळून गेला.

झालेल्या प्रकारातून सावरत महिलेने तातडीने वणी पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली. अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांनी भादंविच्या कलम 354 (अ) (1) (i) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अश्लिल कृत्य करणारा संशयीत तरुण हा अल्पवयीन असल्याचा अंदाज आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय आनंदराव पिंगळे करीत आहे.

हे देखील वाचा:

शिरपूर पोलिसांच्या पठाणी वसुलीमुळे ट्रान्सपोर्टर त्रस्त

अखेर भूमी अभिलेखच्या ‘त्या’ वादग्रस्त कर्मचा-यासह तिघांवर गुन्हा दाखल

Leave A Reply

Your email address will not be published.