लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने प्रेयसीला नेले गावी पळवून

भास्कर राऊत, मारेगाव: प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून पळवून प्रेयसीला त्याच्या गावी पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने सातत्याने प्रेयसीचे शोषण केले. अखेर लग्नास नकार देत प्रियकराने प्रेयसीला गावी नेऊन सोडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. मारेगाव पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की पीडित तरुणी (22) ही मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती तिच्या आईवडील व भावांसोबत राहते. ती मजुरीचे काम करते. एका वर्षाआधी मुलीच्या वडिलांच्या शेतात विहीरीचे काम सुरू होते. त्यासाठी आरोपी प्रियकर गणेश अभिमान आत्राम (26) रा. इंदिराग्राम ता. मारेगाव हा आला होता. तिथून पीडित तरुणी व गणेश त्यांच्यात ओळख झाली. पुढे दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले.

दरम्यान दोघेही संधी साधून एकमेकांशी तासंतास फोनवर बोलायचे. घरी कुणी नसताना मुलगी प्रियकराला घरी देखील बोलवायची. एके दिवशी प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवत प्रेयसीशी शारीरिक संबंध केले. त्यानंतर कधी घरी, तर कधी बाहेर जिथे संधी मिळेल तिथे दोघांमध्ये संबंध व्हायचे.

प्रियकराने नेले प्रेयसीला पळवून
गेल्या आठवड्यात म्हणजे दिनांक 28 मार्चला दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास गणेश हा प्रेयसीच्या वडिलांच्या शेतात प्रेयसीला भेटायला आला. तिथे त्याने तरुणीला आपण दोन दिवसांत लग्न करू तू माझ्या घरी चल, अशी गळ घातली. प्रेयसी गणेशच्या बोलण्यात येऊन इंदिराग्रााम येथील प्रियकराच्या घरी गेली. तिथे त्याने आज लग्न करू, उद्या लग्न करू अशी बतावणी करत सातत्याने प्रेयसीचे शोषण  केले. 

सोमवारी दिनांक 3 एप्रिल रोजी प्रियकराने तरुणीला आपण उद्या लग्न करू असे सांगितले. मंगळवारी प्रेयसीने प्रियकराला लग्नबाबत विचारणा केली, मात्र मी आता तुझ्याशी लग्न करीत नाही. तुला जे करायचे ते कर अशी धमकी त्याने तिला दिली. संध्याकाळच्या सुमारास प्रियकराने प्रेयसीला तिच्या गावी सोडून दिले. दरम्यान प्रेयसीच्या कुटुंबीयांनी गणेशला लग्नाबाबत मनधरणी केली मात्र त्याचे प्रयत्न सफल झाले नाही. प्रियकर लग्नास नकार देत जे करायचे आहे ते करा, यावर ठाम होता. 

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रेयसीने तिच्या कुटुंबीयांसह मारेगाव पोलीस स्टेशन गाठते व प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून प्रियकर गणेश अभिमान आत्राम विरोधात भारतीय दंड संहीतेच्या कलम 376, 376(2)(n), 417, 506 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

प्रेमनगर येथे पोलिसांची ‘रेड’, 2 महिला ताब्यात

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दीपक चौपाटीवर रात्री राडा, एकाला बेदम मारहाण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.