मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार

आरोपी कृषी केंद्र चालकाला अटक

0

जितेंद्र कोठारी, वणी: मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 27 वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार 5 मार्च रोजी उघडकीस आली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कृषी केंद्र चालक संदीप पिंपळकर (35) याला अटक केली आहे.

Podar School 2025

तक्रारीनुसार आरोपीचे वणी येथे विराणी फंक्शन हॉल समोर श्रीराम कृषि केंद्र नावाने कृषी साहित्याचे दुकान आहे. पीडित महिलेच्या पती सोबत त्याची ओळख होती. महिलेचा मुलगा शिक्षणा करीता वणी येथे आजीच्या घरी राहत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फिर्यादी महिला मुलाला भेटण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात गावावरून वणी आली असता आरोपीने महिलेला फोन करून एका शाळेजवळ बोलाविले. महिला शाळाजवळ पोहचली असता आरोपीने तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन मोटरसायकल बसवून वरोरा येथे नेले. वरोरा येथे एका हॉटेलमध्ये आरोपी संदीप पिंपळकर याने तिच्यावर बलात्कार केले. त्यानंतर आरोपीने धमकी देऊन अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.

वारंवार होत असलेल्या अत्याचाराने त्रस्त पीडित महिलेंनी अखेर शुक्रवार 5 मार्च रोजी वणी पोलीस स्टेशन गाठून आरोपी संदीप सुधाकर पिंपळकर (35) रा. बोपापुर (बाळापूर) ता. झरी विरुद्द तक्रार नोंदवली. वणी पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 376 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक केली.

आरोपी संदीप पिंपळकर याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.