घुग्गुस रोडवरील टोलनाका स्थलांतरीत करण्याची युवासेनेची मागणी
टोलनाक्यामुळे अपघातात वाढ झाल्याचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: करंजी, वणी, घुग्गुस महामार्गावर शहरालगत असलेला टोल वसुली नाका वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. टोल नाक्याजवल वाहनांची गर्दी व रेल्वे फाटक असल्यामुळे या ठिकाणी अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे सदर टोलनाका शहरापासून दूर हलविण्यात यावा. अशी मागणीचे निवेदन युवासेना वणीतर्फे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पासून काही मीटर अंतरावर आयव्हीआरसीएल कंपनीचे टोलबुथ उभारण्यात आले आहे. सदर टोलबुथवर कोळसा वाहतूक करणारे अतिजड वाहनांची रांगा लागून राहते. वणी रेल्वे सायडिंगवरुन कोळसा भरुन जाणाऱ्या मालवाहू रेल्वेमुळे दिवसभरात अनेकदा रेल्वे फाटक बंद राहते. दरम्यान या रस्त्यावर वाहतूक जाम होऊन खाजगी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
टोल नाक्याचे नेहमी एकच टोल काऊंटर सुरु असते. त्यामुळे पथकर फाडण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सुरक्षेच्या उपाय योजनांचाही या टोल नाक्यावर अभाव दिसून येतो. रुग्णवाहिकाही नेहमी नादुरुस्त असते. रुग्णवाहिकांचे इन्शुरन्सही लॅप्स झालेले आहेत. टोलनाका परिसरात एक कोळसा ट्रान्सपोर्ट कंपनीचा कार्यालय आहे. त्यामुळे टोल नाक्याजवळ नेहमी कोळसा वाहतुकीची वाहने उभी असतात.
टोल नाक्यामुळे कास्तकारांची मोठी गोची झाली आहे. शेतमाल विक्रीकरिता घेऊन येणारी वाहने टोल नाक्याचा भुर्दंड बसू नये म्हणून शहरातील अरुंद रस्त्यांवरून जाणे येणे करतांना दिसतात. टोल नाक्याच्या जवळपासच्या परिसराची साफसफाई देखील केली जात नाही. टोल नाका परिसरात धुळीचे थर जमा झाले आहेत. वाहनांच्या जाण्यायेण्याने सारखी धूळ उडत असते परिणामी टोल नाक्याजवळ नेहमी काळं धुकं पसरलेलं असतं. कित्येक छोटे मोठे अपघात या टोल नाक्याजवळ झाले आहेत. त्यामुळे हा टोल नाका आता वाहतुकीसाठी व मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. तेंव्हा हा टोल नाका अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे झाले आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. टोलनाका स्थलांतरित न केल्यास युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना युवासेना यवतमाळ उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, मंगल भोंगळे, प्रफुल बोरडे, गजानन बदखल, राजु इड्डे, जनार्धन थेटे, राजु अर्पेल्लिवार, रितिक पचकते, अमोल मडावी, सुमित सिरसाट, ओम आगुलवार, स्वप्नील मंदे, निखिल गट्टेवार, सुमित सिरसाट, यश सोनकर, सत्य तिस्कतकार, उमेश आसुटकर, वैभव डंभारे, संदीप बुरान, राहुल चिडे व युवसैनिक उपस्थित होते.
हे देखील वाचा:
मुलीच्या आत्महत्येपाठोपाठ वडिलांचाही विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न
जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू
Comments are closed.