अखेर मंदिरासमोरील ‘ते’ अतिक्रमण काढले

गुरुवर्य कॉलनीतील नागरिकांनी केली होती तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ मार्गावर स्थित गजानन महाराज मंदिरासमोर पुजाऱ्यानी अतिक्रमण करून सुरु केलेल्या भोजनालयाचे टिनशेड नागरिकांच्या तक्रारीनंतर सोमवारी काढण्यात आले. नगर परिषद कडून नोटीस मिळाल्यानंतर पुजाऱ्यानी स्वतःहून अतिक्रमण हटविल्याने गजानन महाराज मंदिराने मोकळा श्वास घेतला आहे.

Podar School 2025

गजानन महाराज मंदीरातील पुजारी कुटुंबाने सार्वजनिक मंदिराच्या भीतीला लागून रस्त्यापर्यंत अतिक्रमण करून भोजनालयचे व्यवसाय सुरु केले होते. मंदिरासमोर व्यवसाय थाटल्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जाणे अवघड झाले होते. मंदिराच्या बाजूलाच देशी दारुची दुकान असून दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना विशेषतः महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याबाबत गुरुवर्य कॉलोनीवासीयांनी नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार करून मंदिर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने नगरपरिषद बांधकाम विभागाने गजानन महाराज मंदीराच्या पुजाऱ्याला नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. तसेच स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास बांधकाम पाडण्याची सूचना देण्यात आली होती.

नगरपरिषदच्या आदेशानुसार पुजारी कुटुंबाने रविवार पासून अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. त्यामुळे गजानन महाराज मंदिराला आता पुर्ववैभव प्राप्त झाला आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.