रेतीची अवैध वाहतूक, 4 ट्रॅक्टरवर मारेगाव पोलिसांची कारवाई 

11 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त, 12 आरोपींना अटक, एक रेतीतस्कर वाहनासह फरार

1

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील हिवरा मजरा शिवारात रेतीतस्करी होत असल्याची गुप्त माहिती मारेगाव पोलीस व महसूल विभागाला मिळाली. परफेक्ट सापळा रचून रेतीतस्करी करणारे 4 रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त करून 12 आरोपींना मारेगाव पोलिसांनी अटक केली. यात एकूण 11 लाख 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी एक रेतीतस्कर वाहनासह फरार झाला.

Podar School 2025

प्रात माहितीनुसार तालुक्यातील बंद असलेल्या रेतीघाटावरून अवैध रेतीतस्करी करणाऱ्यांच्या मागावर मारेगाव पोलीस होते. रात्री 2 वाजता 4 रेती भरलेले ट्रॅक्टर (MH 34 BF 5822), (MH 34 AB 4808), (MH 29 C 4395) आणि (MH29 BC 4281) ह्या ट्रॅक्टरमधून 4 ब्रास रेती जप्त केली. 12 आरोपींना 11 लाख 80 हजारांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सर्व आरोपींना बुधवारी मारेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. रेतीतस्करी करताना सचिन कवडू खिरटकर, रा. दहेगाव ता. वरोरा, सुधीर हनुमान टोंगे रा. मोहबाळा ता. वरोरा, प्रसाद सुधाकर ढवस, रा. कानडा ता. मारेगाव, विनोद माधव चाहानकर रा. रामेश्वर ता. मारेगाव, सूरज पंढरी ढेंगळे, रा. मोहबाळा ता. वरोरा, विष्णू मोहन कडूकर, रा. दहेगाव ता. वरोरा,

सुमित विनोद कोवे, रा. निमसाळा ता. वरोरा, विकास किसन वाघाडे, रा. कानडा ता. मारेगाव, अंकुश अरुण महारतळे, रा. सिंदी ता. मारेगाव, श्यामल मारोती उरकुडे, रा. रामेश्वर ता. मारेगाव, सूरज भास्कर गजबे, रा. रामेश्वर ता. मारेगाव, बंडू नामदेव झाडे, रा. सिंदी ता. मारेगाव यांच्यांवर कलम 379/34 भादंविनुसार कारवाई करून अटकेतील आरोपींना मारेगाव न्यायालयात हजर करण्यात आले.

मारेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. जगदीश मंडलवार यांच्या मागदर्शनात जमादार सुरेंद्र टोंगे, जमा. कलीम, जमा. गणेश सुंकुरवार, जमा. रमेश ताजने, पो. शि. अजय वाभिटकर यांनी कारवाई केली. महसूल विभागाचे एक पथक कोसारा रेतीघाटाकडे होते, तर मारेगाव पोलिसांचे एक पथक हिवरा मजरा शिवारात होते हे विशेष.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

1 Comment
  1. […] रेतीची अवैध वाहतूक, 4 ट्रॅक्टरवर मारेग… […]

Leave A Reply

Your email address will not be published.