गौरकार कॉलनीतील रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात
विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी परिसरालगत असलेल्या गौरकार कॉलोनीतील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सप्टेंबर महिन्यात युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांच्याद्वारे नगर पालिकेला निवेदन देण्यात आले होते. अखेर निवेदनाची दखल घेत रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
गौरकार कॉलोनीतील रस्ता 20 वर्षांआधी तयार झाला होता. मात्र गेल्या काही काळापासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे शाळकरी मुलांची स्कूलबस घरापर्यंत येत नव्हती. ऑटो रिक्षा रस्ता नसल्याने कॉलोनीत जात नव्हते. या कॉलनीत रस्त्या तयार करतेवेळी सांडपाणी जाण्यासाठी नाल्या बांधण्यात आल्या होत्या. या नाल्या देखील फुटल्या होत्या.
या सर्व समस्या घेऊन कॉलनीतील जनतेने 6 महिन्याआधी अजिंक्य शेंडे यांची भेट घेतली होती. अजिंक्य यांनी त्वरित याबाबत वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेत याबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु दरम्यान पदवीधर निवडणूक व आचार संहितेमुळे या कामाला उशीर झाला. अखेर 8 मार्च रोजी कामाला सुरुवात झाली. रस्त्याच्या कामाला सुरवात झाल्याने गौरकार कॉलनीतील रहिवासी समाधान व्यक्त करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.