जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन शाळकरी मुलीने सततच्या अत्याचारामुळे मानसिक तणावात येऊन हारपिक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पुनवट येथे ही घटना घडली आहे. सध्या मुलीची प्रकृती स्थीर असून आरोपी सागर राजू सातपूते (24) रा. पुनवट याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की अल्पवयीन बालिका ही पुनवट येथे राहते. ती 9 व्या वर्गात शिक्षण घेते. आरोपी सागर राजू सातपुते (24) हा देखील गावातच राहतो. त्याची अल्पवयीन मुलीवर नजर पडली होती. गेल्या महिन्यात सागरने अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठले व तिथे प्रपोज केले. झालेल्या प्रकाराने मुलगी घाबरली. घाबरल्याने तिने घरी याबाबत कुणालाही काही सांगितले नाही.
27 सप्टेंबरला सागरने पुन्हा रस्त्यात मुलीला गाठले व तिला घरी नेले. तिथे नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. शिवाय याबाबत कुणाला काही सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. झालेल्या प्रकाराने पीडिता घाबरली तर आरोपीची हिम्मत आणखीनच वाढली. सागरने मुलीना 6 ऑक्टोबर रोजी पुन्हा रस्त्यात गाठले व पुन्हा घरी चलण्याचा आग्रह केला.
सततच्या त्रासामुळे मुलगी घरी आली व तिने बाथरूममध्ये जाऊन हारपिक प्राषश केले. काही वेळाने मुलीच्या आईला ही बाब माहिती झाली. तिने मुलीला वणीतील एका खासगी रग्णालयात उपचारासाठी आणले. शुक्रवारी तिची प्रकृती स्थीर झाली. त्यामुळे मुलीच्या नातवाईकांनी तिला विश्वासात घेऊन आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत विचारणा केली असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
मुलीने सागरचे सर्व सांगितले. अखेर मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी सागर राजू सातपुते (24) राहणार पुनवट याच्या विरोधात भादंविच्या कलम 376 (3), 35 D, 341, 506 व पोस्को अंतर्गत कलम 4, 6, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च
Comments are closed.