सामाजिक कार्यकर्ते शेख कादर शेख रहेमान यांचे निधन

मारेगावचे माजी सरपंच व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावचे माजी सरपंच व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शेख कादर शेख रहेमान (71) यांचे रात्री 1.30 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. कादर यांचे कादर सायकल स्टोअर्स नावाचे सायकल स्टोअर्स आहे. ते सामाजिक क्षेत्रात कायम अग्रेसर राहायचे. एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता हरवल्याची भावना शहरात व्यक्त केली जात आहे.

रविवारी दिनांक 21 मार्च रोजी कादर हे नेहमी प्रमाणे आपल्या परिवारा सोबत होते. रात्री जेवणानंतर आराम झोपी गेले असताना रात्री 1.30 वाजताच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे भरती केले असता डॉकटराणी त्यांना मृत घोषित केले. यांचे मागे पत्नी 2 मुले, 1 मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय योगदान
कादर हे शहरातील एक सन्मानणीय व्यक्तीमत्व होते. सामाजिक कार्यात ते कायम अग्रेसर राहायाचे. मुस्लिम समाजातील गरीब असो या श्रीमंत कोणत्याही व्यक्तीचा मृत्य झाला की ते स्वतः पुढाकार घेऊन कमेटीच्या वतीने मोफत कबर खोदून द्यायचे. यांच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

संतप्त पालकांची स्वर्णलीला शाळेवर धडक, फीसमध्ये सवलत देण्याची मागणी

दीपक चौपाटी परिसरात राडा, एकावर सत्तूरने हल्ला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.