रेल्वेने झाला अपघात: इसम ठार

चिखलगाव क्रॉसिंग येथील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे रविवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वेने अपघात झाला. उपचारासाठी नेतानाच इसमाचा मृत्यू झाला. या अपघातात इसमाचे दोन्ही पाय कटल्याचे समजते. रक्तस्राव अधिक झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

रविवारी 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास चिखलगाव येथील रहिवासी असलेले विजय अग्रवाल (45) हे रेल्वेच्या समोर आले. यामध्ये त्यांचे दोन्ही पाय कापले गेलेत. गावकऱ्यांनी समयसूचकता दाखवीत रुग्णवाहिका बोलाविली.

परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. विजय हे लालपुलिया येथील FCI कोल फिल्ड कंपनीत काम करीत असल्याची माहिती आहे. ते मूळचे अकोला जिल्हातील असूूून ते त्यांच्या भावासह चिखलगावला राहत होते.

अपघात की आत्महत्या?

15 दिवसांपूर्वी त्यांचा वणीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. शुक्रवार 9 तारखेला त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती. तेव्हापासून ते मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. या तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. तरीदेखील हा अपघात आहे, की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.