पोलिसांशी अरेरावी करणे पडले महागात, सिंधी कॉलोनी राड्यातील आरोपींवर आणखी गुन्हे दाखल

पोलिसांशी अरेरावी, शिविगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याने दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल.... रा़डा प्रकरणी क्रॉस कम्प्लेंट दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: सिंधी कॉलोनीत राडा झाल्यानंतर रात्री दोन्ही पक्षाचे लोक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सुधीर आणि आरोपी करण या दोघांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना शिविगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यावरून दोन्हीं आरोपींविरोधात विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सिंधी कॉलोनीतील तक्रारदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी देखील गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी क्रॉस कम्प्लेंट दाखल करण्यात आली असून सिंधी कॉलोनीतील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, सिंधी कॉलोनीतील कॉलिटी नामक रेस्टॉन्टरमध्ये शनिवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हॉटेलचे बिल देण्यावरून राडा झाला होता. त्यानंतर सदर प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले. दोन्ही पक्षाकडील लोक तसेच सिंधी कॉलोनीतील काही तरुण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. दरम्यान पोलीस ठाण्यात पोलीस नाईक अविनाश बानकर हे दैनिक अंमलदार तर पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड हे त्यांचे मदतनीस म्हणून कर्तव्यावर होते.

पोलीस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी सिंधी कॉलोनी राड्यातील आरोपी करण पोचन्ना चुणारकर (38) रा. दामले फैल वणी व आरोपी सुधीर गणपतराव पेटकर (40) रा. लक्ष्मीनगर नांदेपेरा रोड वणी हे आले होते. दरम्यान त्या दोघांनी दारूचे सेवन केले असल्याचे पोलिसांना आढळून आले. तिथे दोन्ही आरोपी हे जोरजोरात ओरडत होते. तसेच दोन्ही आरोपी हे तक्रारदार यांना शिविगाळ करीत करीत पोलिसाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी इतर पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबत देखील दोन्ही आरोपींनी अरेरावीची भाषा करीत शिविगाळ केली.

त्यानंतर दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठवण्यात आले. तपासणीनंतर परत आल्यावर पोलीस कर्मचारी काम करीत असताना त्यांच्या अंगावर धावून जाणे तसेच कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. शिवाय शिविगाळ करून पोलीस कर्मचा-यांना तुम्हा सर्वांना पाहून घेईल अशी धमकी दिली.

या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी अविनाश बानकर यांनी आरोपी करण व सुधीर विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी करण चुणारकर व सुधीर पेटकर या दोघांविरोधात भादंविच्या कलम 353, 504. 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

रा़डा प्रकरणी क्रॉस कम्प्लेंट दाखल
या प्रकरणी आरोपी करण चुणारकर द्वारा तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुदामा साधवानी, इंदर साधवानी यांच्या सह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार सुदामा यांना जेवण करण्यास बोलावले असता त्यांनी जेवणास नकार देत ग्लास फेकून मारला. त्यानंतर चार लोकांनी घटनास्थळी येऊन फायटर व लाथाबुक्यांनी मारहाण करत धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी चार आरोपींविरोधा भादंविच्या कलम 324, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर: 

शुल्लक कारणावरून सिंधी कॉलोनीतील रेस्टॉरन्टमध्ये राडा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.