मारेगाव येथे ग्रामीण पत्रकार संघटनेचे ठाणेदारांना निवेदन
पत्रकाराच्या अटकेविरोधात निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी
नागेश रायपुरे, मारेगाव: प्रभाकर भोयर मृत्यूप्रकरणी वणी येथील पत्रकार विवेक तोटेवार यांच्या अटकेविरोधात मारेगाव तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघटनेने मारेगाव ठाणेदारांची भेट घेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान ठाणेदार जगदिश मंडलवार यांच्या मार्फत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वणी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले.
पत्रकार विवेक तोटेवार यांच्या अटकेचे पडसाद मारेगाव तालुक्यातही दिसून आले आहे. गुरुवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे ठाणेदार यांची भेट घेत तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. चर्चेनंतर पत्रकारांनी ठाणेदारांमार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर केले.
प्रभाकर भोयर मृत्यूप्रकरणी वणी शहरातील पत्रकार विवेक तोटेवार यांना दिनांक 10 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांनी कव्हर केलेल्या एका बातमीच्या आधारे ही अटक झाली आहे. एखाद्या बातमीच्या आधारे जर पत्रकारांना अटक होत राहिली तर पत्रकारांना पत्रकारिता करणे कठीण होईल. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मीडियाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर हा घाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांनी निवेदनातून केली.
यावेळी पत्रकार प्रा. डॉ. माणिक ठिकरे, ज्योतिबा पोटे, अशोक कोरडे, नागेश रायपुरे, माणिक कांबळे, उमर शरीफ, श्रीधर सिडाम, दिलदार शेख आदी पत्रकार उपस्थित होते.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: