दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाचा कळपातील गायीवर हल्ला

मेंढोलीच्या जंगलातील घटना, शेतकरी, पशूपालक दहशतीत

तालुका प्रतिनिधी, वणी: मेंढोलीच्या जंगलात गायीवर वाघाने हल्ला केल्याची घटना दि. 4 डिसेंबर सोमवारला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. गुराखी जंगलात गुरे चारत असताना वाघाने गायीवर हल्ला केला. सुदैवाने हल्ल्यात शेतकरी विजय बालाजी ताजने यांच्या मालकीची गाय किरकोळ जखमी झाली. या भागात पट्टेदार वाघाचा वावर असल्याला दुजोरा मिळाल्याने परिसरातील शेतकरी, पशूपालक दहशतीत आले आहे. वनविभागाने सदर घटनेची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी गावकरी करीत आहे.

वणी तालुक्यातील मेंढोली ते पिंपरी शिवारालगत असलेल्या जंगलात मेंढोलीचे गुराखी गुरे चराईस नेतात. सोमवारी दुपारी गुराखी, शेरकी जंगलात असताना झुडुपात दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने कळपातील गायीवर हल्ला केला. मात्र, घाबरून जनावरं सैरावैरा होताच उपस्थित सर्व गुराख्याने आरडाओरडा केली. दरम्यान वाघाने पळ काढला. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात गाय किरकोळ जखमी झाली आहे.

 

परिसरातील नागरिकांना सातत्याने वाघाचे दर्शन
सदर जंगल ओलांडून मेंढोली गावातील अनेक शेतकऱ्यांना दररोज शेतात येजा करावी. सदर जंगलालगत मेंढोली, पिंपरी आणि बोरगावची शेती आहे. शनिवारला वाघ गावालगत महादेव नालमवार या शेतगड्याला दिसला होता. तर रविवारी सायंकाळी शेतकरी नथु खामणकर शेतातून बैलबंडी घेऊन येताना बैलबंडीच्या मागे असलेल्या गोऱ्यावर वाघाने झडप घातली होती.

गायीवरील हल्ल्याच्या घटनेवरून मेंढोलीच्या जंगलात वाघाचा वावर असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. या घटनेनंतर शेतकरी, शेतमजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मेंढोली, बोरगाव, पिंपरी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

मोहुर्लीतील तरुणांच्या समयसूचकतेमुळे एका दुर्मिळ पक्षाला मिळाले जीवदान

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.