बेरोजगारीला कंटाळून जावयाची आत्महत्या

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने होते नैराश्यात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यातून एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा (पिसगाव) येथे उघडकीस आली. लॉकलाऊनमुळे रोजगार गेल्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांनी सास-यांच्या शेतात जाऊन गळफास घेतला.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की मृतक यशवंत वामन खडसे (51) हे त्यांची सासुरवाडी पांढरकवडा (पिसगाव) येथे त्यांची पत्नी व दोन अपत्यासह राहत होते. आधी ते मुंबई येथे कामाला होते. तिथे त्यांनी 14 वर्ष काम केले. मात्र दोन वर्षांआधी त्याची मुंबईतील नोकरी गेली. त्यानंतर ते हिंगणघाट येथे एका मिलमध्ये नोकरी करत होते. तिथे त्यांची दोन वर्षांपासून नोकरी सुरू होती. मात्र  मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू त्यामुळे त्यांची तिथली देखील नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर ते सहा महिन्याआधी कुटुंबासोबत पांढरकवडा येथे सासुरवाडीत राहायला आले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अल्प काळातच दोनदा रोजगार गेल्याने यशवंत नैराश्यात होते. अखेर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय़ घेतला. शनिवारी दुपारी ते त्यांच्या सास-याच्या शेतात गेले. तिथेच त्यांनी गळफास घेऊन त्यांची जीवनयात्रा संपवली. संध्याकाळपर्यंत यशवंत घरी न आल्याने त्यांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. अखेर शेतात जाऊन पाहणी केली असता संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांना यशवंत यांनी गळफास घेतल्याचे आढळले.

त्यांच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे. मारेगाव पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची नोंद केली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

हे देखील वाचा:

लाख मोलाचा बैल अन् परंपरा ब्रिटिशकालीन

Leave A Reply

Your email address will not be published.