एका ‘चमत्काराने’ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा टॅक्स जमा
ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू, विविध प्रक्रियांना आला वेग
सुशील ओझा, झरी: अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून टॅक्स न भरलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावात चपराशी दहा चकरा मारून सुद्धा टॅक्स वसूल होत नाही; परंतु निवडणूक लागताच बहुतांश टॅक्स वसूल होतो हे निश्चित. हादेखील एक मोठा ‘चमत्कार’च आहे.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक लढविण्याकरिता शासनाचे विविध नियम आहेत. उमेदवारी अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे संपूर्ण टॅक्स भरून नील केलेले प्रमाणपत्र अर्ज भरताना जोडावे लागते.
त्या अनुषंगाने मुकुटबन ग्रामपंचायतची निवडणूक लढविणाऱ्या ४७ लोकांनी आपले घर टॅक्स भरलेत. सर्व उमेदवारांची एकूण रक्कम ४ लाख २८ हजार रुपये जमा झाली आहे. टॅक्स भरणाऱ्यांमध्ये कुणी रोख, कुणी ऑनलाईन तर कुणी चेकद्वारे टॅक्स भरले आहेत.
ऑनलाईन व चेकद्वारे दिलेली रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा न झाल्यास शासनाच्या नियमांप्रमाणे कार्यवाहीचे प्रावधान आहे. ग्रामपंचायत निवडणूक लागताच तीन दिवसांत टॅक्सची रक्कम जमा झाली. तर तालुक्यातील इतर ४० ग्रामपंचायत मिळून लाखोंची रक्कम टॅक्स स्वरूपात जमा झाली आहे.
हेदेखील वाचा
हैदेखील वाचा
हैदेखील वाचा