9 वर्षांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

मन्यार जातीच्या सापाचा दंश, मेंढोली येथील घटना

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली येथील कु. वर्षा अय्या टेकाम या 9 वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. वर्षाला उपचारासाठी वणी येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पहाटे तिचा मृत्यू झाला.

अय्या टेकाम हे मुळचे मारेगाव तालुक्यातील सुसरी पेंढरी येथील रहिवाशी आहे. ते तीन वर्षांपूर्वी गावात आले होते. गावातीलच शामदेव खाडे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. पत्नी व 2 मुली व एक मुलासह ते गावातच राहतात. शनिवारी रात्री सर्व कुटुंबीय हे खाली जमिनीवर गादी टाकून झोपले होते.

मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास वर्षाला मन्यार (common krait) या विषारी सापाने हाताच्या बोलाला दोन ठिकाणी दंश केला. घटनेची माहिती होताच वर्षाला तातडीने गावातील गणेश चिंचुलकर यांच्या कारने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास वर्षांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्षांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

‘खद खद’ फेम कराळे मास्तर आज वणीत

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

Comments are closed.