विवेक तोटेवार, वणी: आठवडी बाजाराला गेलेल्या एका व्यक्तीची दीपक चौपाटी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. वणीत सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे. कधी दुचाकी चोरी, तर कधी घरफोडी यामुळे वणीकर त्रस्त झाले आहे. त्यातच चोरटा हाती लागत नसल्याने सर्वसामान्य दहशतीत आले आहे.
विठ्ठल महादेव बोबडे (57) रा. जैन ले आऊट वणी हे वेकोलि मध्ये कर्मचारी आहे. 31 डिसेंबर रोजी रविवार संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या स्प्लेडर या दुचाकीने (MH29 BG9216) आठवडी बाजारासाठी दीपक चौपाटी परिसरात गेले होते. मटण मार्केट जवळ दुचाकी उभी करून ते बाजार घ्यायला निघाले. अर्ध्या तासाने म्हणजे संध्याकाळी 5. 30 वाजता ते बाजार घेऊन परत आल्यावर त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही.
कुणी चुकीने दुचाकी घेऊन गेले असेल, असे वाटल्याने त्यांनी वाट बघितली. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली; परंतु दुचाकी मिळाली नाही. शेवटी चोरी गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी 4 जानेवारी रोजी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यात दुचाकी मालकाचे 30 हजारांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना
शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये कोणतीही कमी आली नाही. बाजारात गेल्यावर अनेक लोक दुकानासमोर गाडी पार्क करतात. मात्र परत आल्यावर त्यांना गाडी चोरीला गेल्याचे आढळते. बस स्टॉप, मुख्य मार्केट, मेन रोड, मंगल कार्यालय, शेत शिवार अशी एकही जागा सुटलेली नाही जिथून दुचाकी लंपास झाली नाही. याशिवाय अनेक घरी पार्किंग किंवा गाडी ठेवण्याची जागा नसते. अशा वेळी ते अनेक वर्षांपासून रात्री दुचाकी घराबाहेर लॉक करून ठेवतात. अशा दुचाकी देखील चोरटे लंपास करीत आहे. दुचाकी चोरट्यांच्या धाकांमुळे वणीकर दहशतीत आले आहे. अध्ये मध्ये एखादा दुचाकी चोरटा पोलिसांच्या हाती लागतो. मात्र दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबताना दिसन नाही.
हे देखील वाचा;
Comments are closed.