अट्टल चोरटा लागला वणी पोलिसांच्या हाती

पोलिसांना सातत्याने गुंगारा देणा-या चोरट्याला शिताफीने अटक... घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लागणार?

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात गेल्या एक महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू आहे. अलिकडे चोरट्यांनी आपला मोर्चा दुकान फोडण्याकडे वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर कुख्यात म्हणून ओळख असलेला राजू उर्फ कटर पुरुषोत्तम पोटे (40) हा वणी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. वणी पोलिसांनी त्याला सापळा रचून घुग्गुस येथून शिताफीने अटक केली आहे. कटरवर चोरीच्या अनेक गुन्ह्याची नोंद असून जुन्या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे की अलीकडे सुरू असलेल्या घरफोडीबाबत हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस कटरच्या मागावर होते. तीन दिवसांपूर्वी तो वागदर येथे असल्याची खबर पोलिसांना लागली. मात्र पोलीस येताच तो भितींवरून उडी मारून पसार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर तो घुग्गुस येथे असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी पुन्हा सापळा रचला. सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी घुग्गुस येथील शिवाजी चौकात मात्र कटर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

अनेक चोरीच्या प्रकरणाचा छडा लागणार ?
गेल्या एक महिन्यांपासून वणीकर घरफोडीमुळे त्रस्त आहेत. घर बंद असले की ते फुटले अशी अवस्था सध्या शहरातील आहे. त्यातच भोंगळे ले आऊटमध्ये भरदिवसा चोरट्यांनी डल्ला मारला. अलिकडेच चोरट्यांनी आपला मोर्चा दुकान फोडण्याकडे हलवला आहे. सुविधा कापड केंद्र चोरट्यांनी फोडले तसेच दुकानाला आगही लावली. तीन दिवसांआधी मुकुटबन रोडवरील एक हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले. अट्टल कटर आता ताब्यात आल्याने चोरीच्या अनेक प्रकरणचा छडा लागू शकतो असा दावा केला जात आहे.

सदर कारवाई ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात डोमाजी भादीकर, विठ्ठल बुरुजवाडे, हरिंद्र भारती, सचिन मडकाम, सागर सिडाम यांनी पार पाडली. वणी पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.

हे देखील वाचा: 

लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांचे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना निधन

आजपर्यंतची सर्वात जम्बो ऑफर: आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहकांना रोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.