वणीत पुन्हा घरफोडी सुरू…. मारोती टाऊनशिपमध्ये चोरट्यांने साधला डाव

बंद घर म्हणजे घरफोडी....! चोरट्यांचा हैदोस कधी होणार बंद?

जितेंद्र कोठारी, वणी: नवीन वर्षानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करत डाव साधला. वणीतील मारोती टाऊनशिप येथे ही घटना घडली. यात सुमारे 15 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. यात रोख रक्कम व दागिन्यांचा समावेश आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की जॉन पोन्नलवार हे वणी शहरालगत असलेल्या मुकुटबन रोडवरील मारोती टाऊनशिप येथे राहतात. 30 डिसेंबरला ते त्यांच्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. घर बंद दिसताच चोरट्यांनी मध्यरात्री कुलूप फोडत घरात प्रवेश केला. त्यांनी कपाटातील रोकड व चांदीचे दागिने लंपास केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज मंगळवारी सकाळी ते गावाहून परत आले. तेव्हा त्यांना घराचे कुलूप फुटलेले आढळले. त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील कपाट फुटलेल्या व कपडे अस्तव्यस्त अवस्थेत आढळले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 15 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. 

चोरट्यांचा हैदोस कधी होणार बंद?
चोरट्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या हैदोसमुळे वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राम महल्ले यांना वणीतून बदलून जावे लागले. नवीन ठाणेदार येताच त्यांच्याकडून वणीकर मोठ्या अपेक्षा व्यक्त करीत आहे. मात्र चोरट्यांचा धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत चोरटे दिसूनही वणी पोलिसांना अद्यापही एकही प्रकरणाचा छडा लावता आलेला नाही.

हे देखील वाचा: 

Comments are closed.