नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव वनपरीक्षेत्रात असलेल्या सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारातील एका नाल्याजवळ दिनांक 23 मार्च 2021 रोजी एक पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी आज दिनांक 19 जून रोजी मध्यरात्री झरी तालुक्यातील येसापूर येथे कोम्बिंग ऑपरेशन करून 3 आरोपींना अटक केली आहे. दौलत भिमा मडावी, मोतीराम भितु आत्राम, प्रभाकर महादेव मडावी सर्व रा. येसापूर ता. झरी असे आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे वन्यप्राण्याचे मांस तसेच शिकार करण्याचे साहित्य आढळून आले. सदर कार्यवाही पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने केली.
23 मार्च रोजी दुपारी सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारातील कोरड्या नाल्यात परिसरातील शेतक-यांना एक वाघ दिसला. मात्र वाघ कोणतीही हालचाल करत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी वाघाजवळ जाऊन बघितले असता त्यांना एक पट्टेदार वाघीण मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. शेतक-यांनी याची माहिती तात्काळ वनविभागाला दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तात्काळ तिथे पोहोचली. तिथे त्यांना वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले होते. ही वाघीण पाण्याच्या शोधात या शिवारात असलेल्या नाल्यावर नेहमीप्रमाणे आली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच दरम्यान शेताला लावलेल्या तारेच्या कुंपनाचा फास वाघिणीच्या गळ्यात अडकल्याचेही आढळून आले होते. वाघ मृतावस्थेत आढळल्याची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली होती. दरम्यान वाघाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या हत्येचा जोमात तपास सुरू होता. ताडोबा येथून डॉग स्कॉड देखील तपासासाठी आले होते.
सदर कार्यवाही किरण जगताप, उपवनसंरक्षक पांढरकवडा वनविभाग पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली. एस आर. दुमोरे सहा वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) पांढरकवडा, विक्रांत खाडे, विजय वारे, माधव आडे, रणजीत जाधव, कु. संगिता कोकणे, तुळशीराम साळुंके, सुनिल मेहरे, आशिष वासनिक, गेडाम, सोनडवले, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस निरिक्षक धर्मा सोनुने मुकुटबन, कु. संगिता हेलोंडे सहा. पोलीस निरिक्षक पाटण, तसेच इतर पोलिस व वन कर्मचारी यांनी केली.
हे देखील वाचा:
[…] […]