बेलोरा-घुग्गुस वर्धा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला

चालक गंभीर जखमी, 100 फूट खाली नदीपात्रात कोसळला ट्रक

बहुगुणी डेस्क, वणी: बेलोरा-घुग्गुसला जोडणा-या वर्धा नदीच्या पुलावरून कोळसा वाहतूक करणारा एक ट्रक नदीपात्रात कोसळला. सुमारे 100 फूट खाली कोसळल्याने ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला. ट्रक चालक कॅबिनमध्ये अडकलेला असून चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. दुपार पर्यंत चालकाला ट्रक मधून बाहेर काढण्याकरिता प्रयत्न सुरु होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच येथे बघ्यांची एकच गर्दी झाली आहे.

आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचा एक 18 चाकी ट्रक (MH34 BZ1401) घुग्गुसहून वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी जात होता. स. 8 वाजताच्या सुमारास ट्रक वर्धा नदीवरील पूल पार करीत होता. दरम्यान चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक पुलाचे कठडे तोडून 100 फूट खाली नदी पात्रात कोसळला.  

हा मार्ग रहदारीचा असल्याने लगेच याची माहिती जवळ असलेल्या नागरिकांना मिळाली. लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना व रेस्क्यू टीमला याची माहिती देण्यात आली. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. गॅस कटरच्या साहाय्याने ट्रकची कॅबिन कापून चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होते. घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी त्याचे व्हिडीओ व्हायरल होताच लोकांची गर्दी आणखी वाढली होती. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आयुर्वेदिक उपचाराने 70 वर्षीय डायबेटिक आजोबांची जखम तीन महिन्यांत बरी

Comments are closed.