प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक व विक्री प्रकरणी आज आणखी दोघांना अटक

डीबी पथकाची प्रतिबंधीत तंबाखूविरोधात टाच

0

विवेक तोटेवार, वणी: प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखूची (मजा) वाहतूक व विक्री करणाऱ्या दोन इसमांना वणी पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी मारेगाव येथील तर दुसरा वणीतील आहे. वणी-यवतमाळ रोडवरील निंबाळा शिवारात आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास एकाला अटक करण्यात आली. तर हा तंबाखू विकाणा-याला सुद्धा वणीतील रंगारीपुरा येथून अटक कऱण्यात आली.

पोलिसांच्या डीबी पथकाला वणी वरून मारेगाव येथे सुगंधित तंबाखूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. याआधारे डीबी पथकाने निंबाळा शिवारात सुगंधी तंबाखूचे 40 डब्बे (मजा) ज्याची किंमत 29435 रुपये व दुचाकी (MH29 AX8937) ज्याची किंमत 50 हजार रुपये असा एकूण 79,435 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीला विचारपूस केली असता त्याने सदर तंबाखू विक्रांत भास्करराव सूत्रावे (48) रा. रंगारिपुरा वणी यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. पोलीसांनी विक्रांत यालाही रंगारीपुरा येथून अटक केली. दोन्ही आरोपींवर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, नियम व नियमाने 2011 चे कलम 26(2) (1), कलम 27 (3) (इ), कलम 23 साहवाचन कलम 30 (2) (ब) कलम 59 सहकलम 188 भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवर, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुदर्शन वनोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, हरींद्र भारती, रत्नपाल मोहडे, दीपक वांड्रसवार यांनी केली.

हे देखील वाचा:

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.