विवेक तोटेवार, वणी: संध्याकाळी लग्न आटपून वणीला परत येत असताना दुचाकी समोर डुक्कर आडवं आल्याने अपघात झाला. वणी-वरोरा रोडवरील गुंजच्या मारोतीनजिक रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे.
अपघातग्रस्त रमेश पारशिवे (50) हे वणीतील मनिषनगर येथील रहिवाशी आहे. ते आरोग्य सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी ते भद्रावती येथे हिरो होन्डा या दुचाकीने एका लग्नाला गेले होते. लग्न आटोपल्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ते भद्रावतीहून वणीसाठी परत निघाले.
संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास रेल्वे क्रॉसिंगजवळ रमेश यांच्या दुचाकीसमोर अचानक एक डुक्कर आडवे आले. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी रस्त्यामध्ये असलेल्या डिव्हायडरवर आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपस्थितांनी जखमी असलेल्या रमेश यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रक्तस्राव अधिक झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. सध्या त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.
दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.