धनोजे कुणबी उपवर उपवधू परिचय मेळावा 3 जानेवारीला
''ऋणानुबंध 2021'' या स्मरणिकेचे प्रकाशन होणार
जब्बार चीनी, वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहुउद्देशीय संस्था वणी जि.यवतमाळ यांच्यावतीने 3 जानेवारी 2021 रोजी रविवारी धनोजे कुणबी समाज भवन वणी येथे राज्यस्तरीय ऑनलाइन उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम वणी येथील धनोजे कुणबी भवन येथे होईल. कोरोना महामारीच्या काळामध्ये समाजबांधवांना लग्न जोडताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मेळाव्याच्या निमित्याने उपवर-उपवधू यांचा परिचय व्हावा आणि लग्न जोडण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने ”ऋणानुबंध 2021” या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. या मेळाव्याला स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य अशोक जीवतोडे (चंद्रपूर) उपस्थित असतील. तसेच उद्घाटक म्हणून खासदार बाळूभाऊ धानोरकर असतील. या मेळाव्यात कोरोनाचे नियम पाळून समाजबांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांच्यावतीने करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
दादासाहेब कन्नमवारांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर व्हावी